अमरावती: दुर्घटनेत मृत पावलेल्या बांधवांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीअजितदादा पवार साहेब यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

अमरावती(Amravati) जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे नदीत नाव उलटून काही जण बुडाल्याची घटना दुर्दैवी आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.दुर्घटनेत मृत पावलेल्या बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती असल्यानं नागरिकांनी नदीपात्रात उतरण्याचं दु:स्साहस करणं टाळावं. सुरक्षितता, सावधानता बाळगावी, असे कळकळीचे आवाहन साहेबांनी केले आहे.
संपादक-श्री नितीन चव्हाण
सहसंपादक-श्री मोहन शिंदे